
Arunoday Bahuuddeshiya Gramin Vikas Sanstha
About us information
अरुणोदय बहुदेशीय ग्रामीण विकास संस्था नजिक बाभुळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर या संस्थेची स्थापना १५ दिसेंबर १९९५ रोजी संस्थेचे संस्थापक श्री नानासाहेब पाटील घनवट यांनी करुन या संस्थेच्या कार्याला सुरुवात केली सन १९९५ पासून ते सन २०२१ या २५ वर्षा च्या काळात संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील अनाथ , अपंग , महिला व बाल आणि निराधार वयोवृद्ध लाभार्थी वर्गासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन या वंचित घटकांना लाभ देण्यासाठी कार्य केलेले आहे व करीत आहे.
संस्थेने आज तागायत महिला प्रशिक्षण केंद्र , अनाथालय , बालगृह , बालकाश्रम , प्राथमिक , माध्यमिक विद्यालय , जुनिअर कॉलेज , ओल्ड एज होम , मल्टीकेअर सेंटर , व्यसनमुक्ती केंद्र , अपंगासाठी साहित्य वाटप केंद्र , प्रशिक्षण केंद्र , नामांकित शाळा इ . सारखे प्रकल्प हाती घेऊन उभे केलेले आहेत छोटेसे लावलेले रोपटे आज मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाले आहे. आज या संस्थेमध्ये जवळपास ६०० ते ७०० लाभार्थी लाभ घेत असून १०० च्या आसपास कर्मचारी वर्ग कार्यरत आहे .
संस्थेने नजीक बाभुळगाव ता. शेवगाव येथे छोटे संकुल उभे केले असून या संकुलामध्ये संस्थेचे कार्य २४ *७ चालू आहे. संस्थेचे कार्यकारी मंडळ १३ सदस्याचे असून अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , खजिनदार व इतर अशा पद्धतीचे असून कार्यरत पदाधिकारी हे संस्थेच्या कामावर २४ तास लक्ष ठेवून असतात. संस्थेची दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू असून आणखी काही दिवसातच मोठ - मोठे प्रकल्प हाती घेऊन कार्यान्वयीत करण्याचा संस्थेचा मनोदय आहे.